शिरोडा येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2023

शिरोडा येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण

 


चंदगड / प्रतिनिधी

        मराठा आरक्षण मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय महासंघ मराठा समाज शिरोडा जि.सिधुदुर्ग येथे शिरोडा ग्रामपंचायती समोर एक दिवसीय लक्षणीय साखळी उपोषणास मराठा बांधवांनी सुरुवात केली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. एक मराठा लाख मराठा..अशा घोषणा दऊन अंदोलकानी परिसर दणाणून सोडला.

       अखिल भारतीय मराठा समाज वेंगुर्ला तालुका अध्यक्ष  सिद्धेश परब यांच्या सह या उपोषणामध्ये शिरोडा अध्यक्ष  राहुल गावडे, सचिव विशाल गावडे, उपसरपंच  चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बंड्या परब तसेच आनंद मसुरकर, बाबल गावडे,रोशन परब, अमोल परब, पुंडलिक उर्फ भाऊ परब, संदीप गावडे, शैलेंद्र गावडे, अशोक गावडे, संदीप परब, किरण राऊत यांच्यासह मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत.

No comments:

Post a Comment