किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस देताना क्लासमेट ग्रुपचे सदस्य. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
मजरे शिरगाव येथील मराठी शाळेच्या सन 1995 च्या क्लासमेट ग्रुप व मित्रमंडळीने खास दीपावलीनिमित्त किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन केले होते. या किल्ला बांधणी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव सूर्यवंशी होते.
स्पर्धेसाठी अनुक्रमे 1251, 751, 551 व 251 ची रोख बक्षिसे व आकर्षक चषक ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत गावातील ८ किल्ला स्पर्धक सहभागी झाले होते. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शनिवार 2 डिसेंबर 2023 रोजी सकाळी मराठी शाळेत पार पाडला. कार्यक्रमावेळी छत्रपती शिवाजी महाराज व थोर संतांच्या कार्यावर आनंदा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
विजयी स्पर्धक कु. रोशन मुळीक, शुभम मांगले, आदिनाथ मुळीक व ज्ञानेश्वर सावंत यांनी क्रमांक पटकावले. त्यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश देवण, विलास वाके, मुख्याध्यापक जयवंत पाटील, मनोहर गावडे सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटण्यात आला. यासाठी सहदेव लाड, राजेश मांगले नारायण मुर्डेकर, विश्वजीत पाटील, ओमकार मुळीक, पवन गावडे, शिवकुमार मुळीक, मधु मुळीक, परशराम मुळीक, उमेश कुंदेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रास्ताविक तुकाराम वाके यांनी केले. आभार सचिन वाके यांनी मांडले.
No comments:
Post a Comment