मांडेदुर्ग येथील माजी सरपंच सुबराव गुंडप यांना पत्नीशोक - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2023

मांडेदुर्ग येथील माजी सरपंच सुबराव गुंडप यांना पत्नीशोक

यशोदा सुबराव गुंडप


कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

       मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील यशोदा सुबराव गुंडप (वय 75) यांचे गुरुवारी  दिनांक 21 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मांडेदुर्ग गावचे माजी सरपंच व निवृत्त शिक्षक सुबराव गुंडप यांच्या त्या पत्नी होत.

        शिवसेनेचे चंदगड तालुका माजी अध्यक्ष संजय गुंडप यांच्या त्या मातोश्री व मांडेदुर्ग येथील अंगणवाडी सेविका अर्चना अरुण गुंडप यांच्या त्या सासू होत. रक्षाविसर्जन सोमवारी दिनांक 25 रोजी सकाळी होणार आहे.

No comments:

Post a Comment