कालकुंद्री येथील सार्वजनिक वाचनालयास वर्षभरात २०० तर एकूण १८०० पुस्तकांची देणगी - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2023

कालकुंद्री येथील सार्वजनिक वाचनालयास वर्षभरात २०० तर एकूण १८०० पुस्तकांची देणगी

 

केंद्रप्रमुख रामदास पाटील यांच्याकडून मिळालेली पुस्तके स्वीकारताना वाचनालयाचे पदाधिकारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

         कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयास पुस्तके देणगीचा ओघ सुरु सुरूच आहे. सन २०२३ मध्ये वाचनालयासाठी ग्रामस्थांच्या देणगीतून २०० पुस्तके जमा झाली झाली असून जमा झालेल्या पुस्तकांची संख्या आता १८०० इतकी झाली आहे. ग्रामस्थांच्या देणगीतूनच वाचनालयात रोज ४ दैनिके, ७ मासिके, २ साप्ताहिके नियमित सुरू आहेत. स्थापनेपासून गेली १२ वर्षे विनाअनुदानित असलेले वाचनालय ग्रामस्थांनी समृद्ध करून वाचन चळवळीस गती देण्याचे कार्य केले आहे.

     नुकतीच भोर, जि. पुणे येथील केंद्रप्रमुख रामदास वसंत पाटील (कालकुंद्री) यांनी वाचनालयास ४०पुस्तके भेट दिली. रामदास यांच्या अनुपस्थितीत त्यांची बहीण अध्यापिका निता पाटील, भाऊ बंडू पाटील यांच्या हस्ते वाचनालयाचे अध्यक्ष के. जे. पाटील, उपाध्यक्ष शिवाजी खवणेवाडकर, सचिव शिवाजी पाटील यांनी पुस्तके स्वीकारली. यावेळी माजी जि प सदस्या सुजाता पाटील, कोमल शेटजी, गजानन पाटील, दीपक कालकुंद्रीकर, के. आर. पाटील, प्रा. रवी पाटील, नारायण पाटील, युवराज पाटील, गुंडू पाटील, सुधीर पाटील आदी उपस्थिती होते.

       २०२३ या वर्षात शिवजयंती उत्सव मंडळ- १९ पुस्तके, विनायक तुकाराम पाटील- ८, दीपक कालकुंद्रीकर २,  सुखदेव भातकांडे- ११,  शंकर मुतकेकर- ३२, संजय मारुती कांबळे- २८, गीता कोकीतकर- २, लक्ष्मण यल्लापा पाटील- ६, सविता कुंभार(किणी)-११, उदय कालकुंद्रीकर (बेळगाव)- ६०,   रामदास वसंत पाटील- ४० आदींनी वाचनालय समृद्धीसाठी पुस्तके दान केली. या वाचनालयास शासकीय अनुदान मिळावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

No comments:

Post a Comment