दुंडगे नाईट सर्कल क्रिकेट स्पर्धेत कुदनूर टीम अजिंक्य - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2023

दुंडगे नाईट सर्कल क्रिकेट स्पर्धेत कुदनूर टीम अजिंक्य

दुंडगे येथील नाईट सर्कल क्रिकेट स्पर्धेतील विजेता कुदनूर चा सिद्धेश्वर क्रिकेट संघ

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
   दुंडगे (ता. चंदगड) येथील जय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित  नाईट सर्कल क्रिकेट स्पर्धेत कुदनुर च्या श्री सिद्धेश्वर क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावले. सहा दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण २६ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन गावचे सरपंच चंद्रकांत सनदी, उप सरपंच लक्ष्मण पाटील, ग्रामपंचायत सदस्य नामदेव गवेकर (गोवा पोलीस), भरमू पाटील, राजेंद्र पाटील, गजानन राजगोळकर, मनोहर पाटील, धाकलू खन्नूरकर, अमरसिंह देसाई, नामदेव कोकितकर, केशव पाटील, कल्लाप्पा सुतार, महादेव खन्नूरकर, विद्याधर पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जोतिबा गुंडू पाटील यांच्या हस्ते झाले.
       स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रोख बक्षीस प्रथम क्रमांक रु ५००१/-  व चषक (श्री सिध्देश्वर क्रिकेट क्लब), द्वितीय क्रमांक-  ३००१/-  व चषक (करेकुंडी), तृतीय क्रमांक २००१/-  व चषक (बसर्गे, ता चंदगड) देण्यात आले. वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट फलंदाज विक्रम आंबेवडकर, उत्कृष्ट गोलंदाज अनिल मोहनगेकर तर उत्कृष्ट संघ म्हणून जय हनुमान संघ दुंडगे यांना पारितोषिक देण्यात आली. 

No comments:

Post a Comment