राजगोळी खुर्द गावातील हरहुन्नरी कलाकार हरपला - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2023

राजगोळी खुर्द गावातील हरहुन्नरी कलाकार हरपला

नारायण फकीरा सुतार

कुदनूर / सी. एल. वृत्तसेवा

      राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक नारायण फकीरा सुतार (वय वर्ष 78) यांचं सोमवार दिनांक 25/12/2023 रोजी ठीक सकाळी सव्वापाचला दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. समाजसेवक, हरहुन्नरी कलाकार, दत्त भजनी मंडळ राजगोळी खुर्दचे ते प्रमुख होते. राजगोळी खुर्द आणि पंचक्रोशीत त्यांनी भजन मास्टर म्हणून नाव कमावले होते. अनेक भजनी मंडळाना भजनाचा ताल सूर शिकवत ती उभी केली.

    या त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर, राजगोळी खुर्द गावावर त्याचबरोबर पंचक्रोशीमध्ये दुःखाचा डोंगर पसरलेला आहे. त्यांचा रक्षा विसर्जन विधी बुधवारी सकाळी ठीक ९ वाजता करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment