संघर्ष प्रतिष्ठान तुर्केवाडी व पिनुदादा पाटील फाउंडेशन आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2023

संघर्ष प्रतिष्ठान तुर्केवाडी व पिनुदादा पाटील फाउंडेशन आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

   संघर्ष प्रतिष्ठान तुर्केवाडी व पिनुदादा पाटील फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरास तुर्केवाडी आणि परिसरातील रुग्णांच्याकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य शिबिराचे उद्घाटन तुर्केवाडीतील आशा सेविका व आरोग्य सेविका यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. जी. एन. पाटील सर होते.
    प्रमुख उपस्थिती म्हणून शंकर लक्ष्मण ओऊळकर, गोविंद चौगुले, संजय नारायण गावडे, प्रकाश राणबा पवार, सौ. शांता मारुती लाड, भरमाना विठ्ठल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिभाऊ रामू गावडे, उपाध्यक्ष विलास बसर्गेकर, पिनूदादा फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रताप पाटील व उपस्थित कार्यकर्त्यांनी केले. 
      यावेळी गावातील आरोग्य सेविका सौ. सुलोचना अडकुरकर, आशा सेविका सौ. नंदा फर्जंद, सौ. मिलन पाटील,  सौ. राजश्री पाटील, सौ. कांचन कांबळे यांचा सत्कार संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. या आरोग्य शिबिराचा लाभ अनेक रुग्णांना झाला. 
    या शिबिरात इतर विविध आजाराबरोबरच, ब्लड प्रेशर चेकअप व इसीजीची सुविधा दिल्याने रुग्णांना त्याचा फायदा झाला. अनेक रुग्णांना मोफत इसीजी सेवा या शिबिरात देण्यात आली. यावेळी काही रुग्णांना तपासून पुढील उपचारासाठी संत गजानन हॉस्पिटल महागाव येथे नेण्यात आले. 
    त्याचबरोबर या शिबिरात शासनाच्या विविध मोफत आरोग्य सेवा सुविधांची माहिती देण्यात आली. यावेळी शंकर लक्ष्मण ओऊळकर, हरिभाऊ रामभाऊ गावडे, पिनुदादा पाटील, जी. एन. पाटील आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संघर्ष प्रतिष्ठान व पिनुदादा पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांचे आभार राजू पुंडलिक कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment