के जे पाटील यांच्या 'सुडाग्नी' कादंबरीस साहित्य पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2023

के जे पाटील यांच्या 'सुडाग्नी' कादंबरीस साहित्य पुरस्कार

कल्लाप्पा जोतिबा पाटील यांना उत्कृष्ट कादंबरीसाठी दिला जाणारा 'डॉ. रविराज आसबे साहित्य पुरस्कार' प्रदान करताना साहित्य क्षेत्रातील मान्यवर.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 
       अखिल भारतीय शब्दमंथन समुह यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा 'डॉ. रविराज आसबे साहित्य पुरस्कार' कालकुंद्री (ता. चंदगड) येथील लेखक के. जे. पाटील यांच्या 'सुडाग्नी' कादंबरीस प्राप्त झाला. वाळवे खुर्द (ता. कागल) येथे भरवलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनात उद्घाटक राजन मुठाणे, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील यांच्या हस्ते स्वागताध्यक्ष तानाजी आसबे, साहित्यिक प्रा. अरविंद मानकर, नसीम जमादार, डॉ. गणपती कळमकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
       कल्लापा जोतिबा पाटील हे प्राथमिक शिक्षक असून त्यांचे लचका, तलप, आघात व झुंज हे चार कथासंग्रह व सुडाग्नी ही कादंबरी प्रसिद्ध आहेत. सुडाग्नी या कादंबरीस मिळालेला हा दुसरा पुरस्कार असून या पुरस्काराबद्दल सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment