चंदगड / प्रतिनिधी
कलिवडे-कलानंदीगड (ता. चंदगड) येथील श्री कुलदैवत मंदिराचा कळसारोहण सोहळा मंगळवार दि. २६/१२/२०२३ व बुधवार दि. २७/१२/२०२३ अखेर संपन्न होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कलिवडे ग्रामस्थ भाविकभक्त, दानशूर व्यक्ती, माहेरवासीन यांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या श्री कुलदैवत मंदिराचा कळसारोहण सोहळा दलित वस्ती कलिवडे वारकरी सांप्रदाय व ग्रामस्थ कलिवडे यांच्या अधिपत्याखाली होणार आहे. ह. भ. प. डॉ. विश्वनाथ मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरोहित वेदशास्त्रसंपन्न राजेश कुलकर्णी व सहकारी यांच्या मंत्रघोषात श्री. श्री. श्री. परमपुज्य किसन महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे.
या निमित्त माहेरवासीन महिलांचा स्नेह मेळावा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्रवण सुखाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment