महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे - माजीमंत्री भरमूआण्णा पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2023

महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे - माजीमंत्री भरमूआण्णा पाटील

  

माजीमंत्री भरमूआण्णा पाटील

चंदगड / प्रतिनिधी 

        महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे आणि त्यासाठी विधानसभेतील १६० समाजाला मराठा आमदारांनी आपली राजकीय ताकद पणाला लावावी, अशी मागणी राज्याचे माजी राज्यमंत्री भरमूआणा पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. 

     प्रामुख्याने जिथे ब्रिटिश राजवट होती, तिथे कुणबी समाजाच्या नोंदी झालेल्या नाहीत. तिथे संस्थानिकाकडून राज्यकारभार चालवला जाई. त्या ठिकाणी कुणबी आढळत नाहीत आणि जिथे ब्रिटिश राजवट नव्हती, तिथे कुणबी समाजाच्या नोंदी आढळतात. पूर्वी चंदगड तालुका ब्रिटिश राजवटीत होता. चंदगडचे संपूर्ण कामकाज बेळगाव इलाख्यात होते. चंदगड तालुका नव्हता तर तो चंदगड महाल म्हणून ओळखला जात होता. कर्नाटक राज्यही म्हैसूर राज्य म्हणून ओळखले जात होते. 

          त्यामुळे इथेसंस्थानिकामार्फत थेट ब्रिटिशांचा अंमल होता. म्हणूनच इथे कुणबी समाजाची नोंद नाही. मात्र मराठा हा वर्षानुवर्षे शेतीच करत आहे. शेतकऱ्यालाच पर्यायी शब्द कुणबी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची नितांत गरज आहे. या समाजाची म्हणावी तशी शैक्षणिक प्रगती झालेली दिसत नाही. नोकऱ्या तर या समाजाला मिळतच नाहीत. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुमारे १६० आमदार हे मराठा समाजातून आलेले आहेत. त्यांनाही आपल्या जातीची चाड राहिलेली नाही. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतःची राजकीय ताकद पणाला लावायला हवी होती. मात्र प्रत्यक्षात असे घडताना दिसत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. कुणबी समाजाच्या नोंदी शोधत बसण्यापेक्षा संपूर्ण मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊन मराठा समाजावरील अन्याय नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दूर करावा, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री भरमूआणा पाटील यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment