कुदनूर येथे २६ ते २८ रोजी श्री दत्त मंदिर वास्तूशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2023

कुदनूर येथे २६ ते २८ रोजी श्री दत्त मंदिर वास्तूशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा



कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा 

        कुदनूर (ता. चंदगड) नवीन बांधलेल्या श्री दत्त मंदिराची वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रम दिनांक २६ ते २८ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. सुरगीश्वर संस्थान मठ कसबा नुल चे गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. 

      मंगळवार २६ रोजी ११ वाजता पादुका, मूर्ती पूजन व कलश मिरवणूक नंतर भजन. २७ रोजी सकाळी ९.१५ वाजता वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कळसारोहन व महाआरती. रात्री ९ वाजता आयुब वाटंगी (नेसरी) यांचे प्रवचन तर दि. २८ रोजी सकाळी ८ वाजता अभिषेक, महाआरती व त्यानंतर महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन जीर्णोद्धार कमिटी व वारकरी संप्रदाय मार्फत करण्यात आले आहे

        ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात तलावाच्या काठी हे पुरातन मंदिर दत्त मंदिर आहे. तथापि त्याची दुरावस्था झाल्यामुळे ग्रामस्थांनी याचा जीर्णोद्धार करण्याचा निश्चय केला. व ग्रामस्थांच्या सहकार्याने सहा महिन्याच्या कालावधीत ते पूर्ण केले. 

No comments:

Post a Comment