कोल्हापूर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवपदी सुभाष चौगुले रूजू - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2023

कोल्हापूर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवपदी सुभाष चौगुले रूजू

 

सुभाष चौगुले

चंदगड / प्रतिनिधी

        कोल्हापूर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवपदी सुभाष चौगुले यांची नियुक्ती झाली आहे. सुभाष चौगुले हे कोल्हापूर जिल्ह्यातील मळगे खुर्द (ता. कागल) गावचे सुपुत्र असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर, मळगे खुर्द या प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण मळगे विद्यालय मळगे बुद्रुक या शाळेत झाले. त्यांनी देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथे बीएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 

      शिवाजी विद्यापीठ येथे एमएससी व आदर्श कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे येथून त्यांनी बीएडचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एमएड पदवी घेतली. सन २०१३ मध्ये एम. पी. एस. सी. मार्फत शिक्षणाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. तत्पूर्वी मेन राजाराम, ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे १४ वर्षे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी (निरंतर) म्हणून दोन वर्षे व कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) म्हणून ३ वर्षे काम पाहिले. २०१८ मे पासून कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत होते.

No comments:

Post a Comment