डाकसेवकांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2023

डाकसेवकांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप

चंदगड / प्रतिनिधी

         प्रलंबित विविध मागण्याबाबत आजपासून मंगळवार पासून ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन ( AIGDSU )नॅशनल युनियन ग्रामीण डाकसेवक ( NUGDS ) कोल्हापूर विभाग  कोल्हापूर तील सर्व डाकसेवकांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात चंदगड तालुक्यातील डाकसेवक सहभागी झाल्याची माहीती डाकसेवक सुभाष वाईंगडे( आमरोळी) यानी दिली.

       डाकसेवकाच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे १ ) जीडीएस कर्मचाऱ्यांना आठ तासाचे काम देवून नियमित कर्मचारी म्हणून घोषित करावे . २ ) विभागीय कर्मचाऱ्याप्रमाणे पेन्शन मेडिकल सुविधा शैक्षणिक भत्ता व इतर सुविधा देण्यात याव्यात . ३ ) डॉ . कमलेशचंद्र कमिटीच्या सर्व सकारात्मक शिफारशी विभागीय कर्मचान्याप्रमाणे दि . ०१/०१/२०१६ पासून सिनियर , ज्युनिअर बंचिंग १२,२४.३६ प्रमोशन ग्रुप विमा पाच लाख व ग्रॅज्युएटी पाच लाख तसेच १८० दिवसांची रिटायमेंटच्या वेळी देण्यात यावे . पगार रजा व त्यांचे रोखीकरण ४ ) वैद्यकीय सुविधा कुंटुंबासह देण्यात याव्यात , ५ ) आय.पी.पी.बी. आर.पी.एल. आय . व पी . एल.आय. , चे काम कमिशन ऐवजी वर्कलोडमध्ये समाविष्ट करण्यात यावे . ६ ) शाखा डाक घराणा सर्व सेवा गतिशिलकरण्यासाठी लॅपटॉप , प्रिंटर व ब्रॉडबॅण्ड नेटवर्क सुविधा प्रदान करण्यात यावी . ७ ) सेवानिर्वाह लाभ ( SDBS ) मध्ये जीडीएसना विभागाकडून ३ % ऐवजी १० % योगदान करावे व त्यामधून पेन्शन देण्यात याव्यात अशा मागण्याबाबत हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात

          बी.डी. कलगोंडा,संजय सावळे,आनंदा ठाणेकर चंद्रकांत बुडके,डी . एस . सावंत, तुषार पाटील, संजय पाटील  पांडूरंग परीट बोरपाडळे, एम . बी . पाटील बाणगे एस.जी.तासे  एस . जी . काळुगडे,जी.जी. मोहिते, विलास पोहाळकर, श्रीहरी जोशी, दिलीप पाटील,संभाजी जाधव, के . टी . बिर्जे, राजू कांबळे, एन . डी . टेपूगडे, भगवान गुरव , सदाशिव बेलेकर , राजू सावेकर , गणेश पाडळकर , बचाराम सोनुले , प्रतिक्षा शिरगांवकर , विक्रांत मोरे , शिवाजी जाधव , सुभाष वाईगडे , दयानंद शिंदे , अमोल मोरे , जी.जी. चौगुले , मोहन केळुसकर , ' रामदास गुरव , संजय बिरंबोळे , मारुती गावडे , गणपती पाटील , विठ्ठल पाटील , रामदास दत्तात्रय गुरव , रमेश मामिलवाड़ , वैशाली पाटील , एस . आर . पाटील , डी . डी . कुलकर्णी , किशोर पाटील, खुदबुद्दीन राऊत ,नामदेव गवस,धोंडीबा फाटक,विठ्ठल गावडे,आप्पा तरवाळ,नारायण पावले आदीसह सर्व डाकसेवक सहभागी झाले आहेत.

No comments:

Post a Comment