कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
होसूर (ता. चंदगड) येथील सर्वरोग निदान व उपचार तसेच रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ६५० रुग्णांनी याचा लाभ घेतला. तर ४७ जणांनी रक्तदान केले.
कोल्हापूर जि. प. आरोग्य विभागातील वरिष्ठ सहाय्यक सुबराव रामचंद्र पवार यांनी आपल्या मातोश्री कै. शांताबाई रा. पवार यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार ११ डिसेंबर २०२३ रोजी सर्व रोगनिदान व उपचार शिबिर, दिव्यांग विकास कार्यक्रम (दिव्यांग पुनर्वसनासाठी मदत व मार्गदर्शन), आयुष्यमान भव योजनेंतर्गत गोल्डन कार्ड काढणे व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
शिबिराचे उद्घाटन आरोग्य सेवा विभागीय उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारचे कृषी अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार राजेश पाटील, आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बी डी सोमजाळ, डॉ बी के कांबळे (प्रा. आ. केंद्र कोवाड), माजी जि. प. अध्यक्षा पुष्पमाला जाधव, सरपंच राजाराम नाईक, जागर फाउंडेशन अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले, मराठा बॅंक बेळगावचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, हेल्पर्स ऑफ हॅण्डीकॅप्ड कोल्हापूरच्या सचिव रेखा देसाई, रोटरी क्लब कोल्हापूरचे डिस्ट्रिक गव्हर्नर नासिर बोरसदवाला, प्रेसिडेंट संदीप शहापूरकर, को-ऑर्डिनेटर बाळासाहेब पडळकर, मानसिंग पानसकर सुहास शेलार, एस. एल. पाटील, चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
के. एल. ई. सोसायटी बेळगाव, आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव, जागर फाउंडेशन तसेच हेल्पर्स ऑफ हॅण्डीकॅप्ड कोल्हापूर यांच्या सहकार्याने संपन्न झालेल्या शिबिरात स्त्री रोग रुग्ण- ४, डोळे तपासणी- ६८, त्वचा रोग- ९, जनरल मेडिसिन- ७२, जनरल सर्जरी-१५, अस्थी रोग (हाडांचे विकार)- ९४, ECG- ३०, HB (हिमोग्लोबिन चेक)- १७४, RBS (शुगर चेक)- १७४ अशा ६४० रुग्णांनी लाभ घेतला. यातील ५२ रुग्णांना पुढील मोफत उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.
यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात ४७ दात्यांनी रक्तदान केले. या शिवाय शिबिरात ९० गोल्डन कार्ड व ३० आभा कार्ड काढण्यात आली. यासाठी परिसरातील महा-ई-सेवा केंद्र चालकांनी सहकार्य केले. होसूर येथे नेटवर्कचा अभाव सर्वर डाऊनचा फटका बसल्याने अनेक नागरिकांना कार्ड काढण्यापासून वंचित राहावे लागले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी केएलई हॉस्पिटल बेळगाव व आरोग्य विभाग चंदगड संबंधित डॉक्टर व स्टाफ, आशा स्वयंसेविका व होसूर ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष बेळगावकर यांनी केले. पुंडलिक रामचंद्र पवार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment