दोडामार्गे चंदगड तालुक्यात होणारी गोवा बनावटीची दारू बंद करण्याची मागणी - नितिन फाटक याचे दोडामार्ग पो. नि. अरूण पवार यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2023

दोडामार्गे चंदगड तालुक्यात होणारी गोवा बनावटीची दारू बंद करण्याची मागणी - नितिन फाटक याचे दोडामार्ग पो. नि. अरूण पवार यांना निवेदन

  


चंदगड / प्रतिनिधी

       कोल्हापूर - सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीवर नाकाबंदी असूनही गोवा बनावाटीची अवैध दारू मोठ्या प्रमाणात दोडामार्ग - तिलारी घाट मार्गे चंदगड हद्दीत येत आहे. अवैधरित्या चंदगड तालुक्यात येणारी गोवा बनावटीची दारू व इतर आमंली पदार्थाची होणारी तस्करी बंद करावी अशी मागणी चंदगडचे युवा कार्यकर्ते नितीन फाटक यानी केली आहे. याबाबतचे निवेदन दोडामार्गचे पोलीस निरीक्षक अरूण पवार यांना देण्यात आले आहे.

        महाराष्ट्र -गोवा-कर्नाटक वसलेल्या चंदगड तालुक्यात अवैध मार्गाने गोवा बनावटीची दारू व अमंली पदार्थ याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. दोडामार्ग पोलीस ठाण्या अतंर्गत तिलारी पुनर्वसनवाडी येथे असलेल्या पोलीस चौकी ला चुकवून दारू तस्कर दारूचा पुरवठा करत आहेत, की या चौकीतील पोलीस कर्मचारी यांना मॅनेज करून दारू सप्लाय होत आहे की काय अशी शंका उपस्थित होत आहे. अवैध पद्धतीने अवैध दारू वाहतूक सुरु आहे यावर आळा घालण्यात यावा, जेणेकरून अवैध धंद्यांना आळा बसेल. गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्री संदर्भात सिंधुदुर्ग व कोल्हापूर पोलीस अधिक्षक यांनाही निवेदन देण्यात आले आहे. अवैध दारू वाहतुकीवर कठोरात्मक कठोर कारवाई व्हावी, अन्यथा दोडामार्ग पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा श्री. फाटक यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

No comments:

Post a Comment