राजगोळी- दड्डी मार्गावर अपघात, एक जण ठार...! अज्ञात वाहन चालकावर गुन्हा नोंद - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2023

राजगोळी- दड्डी मार्गावर अपघात, एक जण ठार...! अज्ञात वाहन चालकावर गुन्हा नोंद

मारुती गोपाळ पाटील
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
       राजगोळी खुर्द ते दड्डी मार्गावर यर्तेनहट्टी गावानजिक आज दि. २२/१२/२०२३ रोजी दुपारी ११ वाजता झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नागरदळे (ता. चंदगड) येथील मारुती गोपाळ पाटील (वय ६२) हे जागीच ठार झाले. याबाबत मयत यांचा पुतण्या एकनाथ शंकर पाटील, नागरदळे यांनी चंदगड पोलिसांत फिर्याद दिली आहे.  
   मारुती पाटील कामानिमित्त  यर्तनहट्टी येथे जात असताना चन्नेटी ते यर्तनहट्टी दरम्यान चन्नेटी गावच्या हद्दीत  अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातानंतर अज्ञात वाहनधारक त्यांना गंभीर जखमी अवस्थेत तेथेच टाकून वाहनासह पळून गेला.  अंबुलन्सने त्यांना बेळगाव येथे उपचारासाठी नेले असता  उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते.  घटनेतील अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सब इन्स्पेक्टर हनमंत नाईक व सहकारी अधिक तपास करत आहेत.


No comments:

Post a Comment