कोल्हापूरात २४ डिसेंबर रोजी 'मराठा सेवा संघाची' सभा, मराठा आरक्षण विषयावर होणार चर्चा ... - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2023

कोल्हापूरात २४ डिसेंबर रोजी 'मराठा सेवा संघाची' सभा, मराठा आरक्षण विषयावर होणार चर्चा ...कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा 

    मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य शिवश्री शाहीर पाटील हे पश्चिम महाराष्ट्र समन्वय संपर्क दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.

      यावेळी मराठा आरक्षण मागणी विषयावर चर्चा तसेच बैठकीत मराठा सेवा संघाच्या आगामी वाटचालीत संख्यात्मक, गुणात्मक, रचनात्मक अशा विविध बाबीविषयी सकारात्मक विचारविनिमयाद्वारे संघटनेच्या विस्तारांकरीता महत्त्वाच्या सूचना  तसेच अडचणीच्या मुद्द्यांवर मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

       या संपर्क बैठकीचे आयोजन रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ ते ५.३० (बैठक साडेपाच पूर्वी संपवण्यात येणार आहे) या वेळेत जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी हॉल, दुसरा मजला, साईक्स एक्स्टेंशन, शाहूपुरी, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.     

    तरी या महत्त्वपूर्ण संपर्क सभेस मराठा सेवा संघ व अन्य कक्षांचे कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय आजी माजी पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, आजीव तसेच साधारण सभासद, कार्यकर्ते व हितचिंतक मराठा बंधू-भगिनी या सर्वांनी बिनचूक व वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष महिपती बाबर (कुरुंदवाड) व शहाजी देसाई जिल्हा प्रवक्ता मराठा सेवा संघ कोल्हापूर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment