वाहतूकदारांवरील अन्यायकारी कायद्याच्या निषेधार्थ उद्या चंदगड येथे रास्ता रोको - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2024

वाहतूकदारांवरील अन्यायकारी कायद्याच्या निषेधार्थ उद्या चंदगड येथे रास्ता रोको

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

    केंद्र शासनाने वाहन चालक मालक यांच्या विरोधात काढलेल्या अन्यायकारी कायद्याच्या विरोधात चंदगड तालुक्यातील ट्रक चालक मालक संघटनेच्या वतीने उद्या बेळगाव- वेंगुर्ले राज्य मार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन संघटना अध्यक्ष अशपाक नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली चंदगड तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना नुकतेच देण्यात आले.

     वाहन चालवताना अपघात झाल्यास चालकास १० वर्षे कैद व १० लाख रुपये दंड, असा कायदा पारित करून वाहन चालक मालकांना आयुष्यातून उठवण्याचे कार्य शासनाकडून होत आहे. याच्या निषेधार्थ चंदगड तालुक्यातील ट्रक चालक-मालक संघटनेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन देण्यात आले. चंदगड तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार महसूल यांनी तर पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी ट्रक चालक-मालक तथा वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष अशपाक नाईकवाडी, पप्पू नाईकवाडी, विनोद फाटक, फारुक शेरखान मुस्ताक, सागर शेरेगार, प्रकाश शेरेगार आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment