धनादेश देताना कारखान्याचे अधिकारी.
चंदगड / प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे)
म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील इको केन साखर कारखान्यातील कामगार नामदेव नागो गुरव (वय वर्ष ३८ रा. गोल्याळी, ता. खानापूर, जि. बेळगाव) यांचाअपघाती मृत्यू झाला. मृत्यूची जबाबदारी स्विकारत इको केन साखर कारखाना व्यवस्थापनाने गुरव कुटुंबियांना ५० लाखांची मदत दिली. या अपघाती मुत्यूला कारखान्याला दोषी ठरवत अँड संतोष मळवीकर, माजी सरपंच संभाजी गावडे (कोलीक), सरपंच विलास सुतार (तुडये), नामदेव गुरव, शिवाजी गुरव अपघाती मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबियांना नुकसान मिळावी. यासाठी आंदोलन केले होते. आंदोलनाची दखल घेत एका दिवसाच्या आत कारखान्याकडून ५० लाख रुपये नुकसान भरपाई दिली.
कारखान्यात नामदेव गुरव याचा बेल्टमध्ये हात अडकून मृत्यू झाला. पंचनामा व पोस्टमार्टम करून रात्रभर मृतदेह दवाखान्यात तसाच ठेवण्यात आला. कारखान्यातील हलगर्जीपणा त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे. असे ठणकावत अँड संतोष मळवीकर, माजी सरपंच संभाजी गावडे व सरपंच विलास सुतार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कारखाना स्थळी दाखल झाले. नामदेव गुरव यांचा मृतदेह तीन ते चार तास कारखाना स्थळी ठेवण्यात आला. जोपर्यंत ५० लाख रुपये नुकसान भरपाई मिळत नाही. तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका भूमिका सर्वच आंदोलनकर्त्यांनी घेतली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेवटी दुपारी बाराच्या दरम्यान मृताच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा धनादेश इको केनचे युनिट हेड सतिश अनगोळकर, पीआरओ बाबासाहेब देसाई यांनी आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीत दिला. त्यानंतर इको केन प्रशासनाचे अधिकारी व अँड. मळविकर यांनी मृताच्या गावी जाऊन अंत्यसंस्कार करून श्रद्धांजली वाहिली. मृत झाल्यापासून एका दिवसाच्या आत ५० लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याचा साखर कारखान्यातील हा एक इतिहास असून कामगार वर्ग व मृतांच्या नातेवाईकांमधून समाधान व्यक्त केले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इको केनने प्रतिसाद देत मृताच्या कुटुंबीयांना दिलेली नुकसान भरपाई तात्काळ दिली असली तरी भविष्यात कामगारांच्या सुरक्षितेची काळजी घ्यावी अशा सूचना अँड संतोष मळवीकर यांनी यावेळी कारखाना प्रशासनास दिल्या.
No comments:
Post a Comment