चंदगड / प्रतिनिधी
पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण देऊन फार मोठे कार्य केले आहे.समाजाच्या विचारसरणीत व पारंपरिक मानसिकतेत बदल घडवून आणताना त्यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला. महात्मा फुलेंच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. आज मुली मोठ्या पदावर विराजमान होत आहेत. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत आहेत. उत्तम प्रकारचे शिक्षण घेत आहेत. याचे सारे श्रेय सावित्रीबाईंना द्यावे लागेल ."असे प्रतिपादन प्रा. मेघा कांबळे यांनी केले. त्या येथील माडखोलकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एम. माने हे होते.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. माने म्हणाले "आजच्या काळातही सावित्रीबाईंचे विचार प्रेरणादायी आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनापासून बोध घ्यायला हवा तरच खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारसरणीचा अंगीकार केल्यासारखे होईल. यावेळी डॉ. ए. पी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. चैत्राली सुतार हिने सावित्रीबाईंच्या जीवनावर स्वरचित कविता सादर केली. पथनाट्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थी कलवंतांचा गौरव करण्यात आला. प्रारंभी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. आर. ए. कमलाकर यांनी केले. डॉ. एस. एन. पाटील यांनी आभार मानले. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment