कालकुंद्रीच्या माहेर वाशीण प्रा. सौ. सोनिया चव्हाण यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2024

कालकुंद्रीच्या माहेर वाशीण प्रा. सौ. सोनिया चव्हाण यांचे निधन

प्रा. सौ. सोनिया राज चव्हाण
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा   
      कालकुंद्री (ता. चंदगड) येथील माहेर वाशीण प्रा. सौ. सोनिया राज चव्हाण, (शोभा सट्टूपा पाटील) वय ३५ यांचे आज दि २/१/२०२४ रोजी सकाळी अल्पशा आजाराने सातारा येथे निधन झाले.   
      छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे समाजशास्त्र विभागात प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत होत्या. कालकुंद्री (ता. चंदगड येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक स द पाटील यांची ती कन्या, तर होसूर येथील ना सि पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक जे एस पाटील यांची बहीण होती. शाहूनगर गोडोली येथील रहिवासी असलेल्या प्रा सोनिया यांच्या पार्थिवावर सातारा येथील श्रीक्षेत्र माहुली येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने कालकुंद्री व पंचक्रोशीसह सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पती व मुलगी असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment