अंकुश रामा गवस |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड शहरातील नवीन वसाहत येथील रहिवाशी सेवानिवृत्त कॅप्टन अंकुश रामा गवस (वय ६५) यांचे निधन झाले. चंदगड तालुक्यातील आजी-माजी सैनिकांना संघटित करून कॅप्टन गवस यांनी अनेक उपक्रम राबवण्याबरोबरच सैनिकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सेवानिवृत्ती नंतरची वर्षे खर्ची घातली. तालुक्यात सैनिक पतसंस्थेची स्थापना करून त्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली. देश सेवेसाठी वाहून घेतलेल्या व सैन्याचा वारसा लाभलेल्या परिवारात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडीलही वरिष्ठ सैन्याधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. शांती सेनेच्या माध्यमातून श्रीलंके सारख्या अशांत देशात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय होते. सैनिकांच्या उन्नती बरोबरच चंदगड तालुक्यातील सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्यही त्यांनी केले. त्यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी भारतीय सैनिकांनी मानवंदना दिली.
चंदगड तालुक्यातील इसापुर हे मूळ गाव असलेल्या कै. अंकुश रामा गवस यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे. चंदगड माडखोलकर महाविद्यालयातील संगणक शिक्षक प्रदिप गवस व मुलगी अश्विनी शेरेगार यांचे ते वडील होत.
No comments:
Post a Comment