शरद गावडे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2024

शरद गावडे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

शरद सुभाष गावडे
  

चंदगड / प्रतिनिधी

            आसगाव (ता. चंदगड) येथील युवा कार्यकर्ते शरद सुभाष गावडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा च्या कोल्हापूर जिल्हा (ग्रामीण) उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शरद गावडे याना निवडीचे पत्र देण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे काम समाजातील प्रत्येक घटकात वाढवून त्यांच्या समस्या सोडवून पक्ष विस्ताराचे काम मनस्वी कराल व पक्ष बांधणी मजबूत करून प्रभावी कार्याद्वारे आपले गाव तालुका व जिल्ह्याचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवडीसाठी भाजपाचे कार्यकारिणी सदस्य संग्राम कुपेकर, भाजयुचे जिल्हाध्यक्ष धीरज करलकर यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment