चंदगड / प्रतिनिधी
अंतर्बाह्य सौंदर्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. सौंदर्य हा स्त्रीचा अनमोल दागिना आहे. सौंदर्य म्हणजे फक्त सुंदर दिसणं नाही तर सुंदर असणं देखील असते. ब्युटीपार्लर या कोर्समुळे महाविद्यालयीन विद्यार्थीनींना एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल. कोर्सचा सर्वांनी फायदा करून घ्यावा कारण सध्याच्या युगात असे कोर्स उपयुक्त ठरत आहेत.' असे मत सौ शितल विशाल पाटील यांनी केले.
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ब्युटी पार्लर कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दौलत विश्वस्त संस्थेचे सचिव विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ब्युटी पार्लर कोर्सच्या समन्वयक डॉ. जे. जे. व्हटकर यांनी करून या कोर्स मागचा उद्देश व हेतू विशद केला. यावेळी सचिव विशाल पाटील, प्रशिक्षक सौ. वैशाली चव्हाण, श्रीमती वंदना केळकर, प्रा. अश्विनी राठोड, प्रा. श्रृती पाटील व सहभागी विद्यार्थीनी उपस्थित होत्या. इंद्रायणी पाटील हिने सुत्रसंचालन केले. आभार प्रा. आश्विनी राठोड यांनी मानले.
No comments:
Post a Comment