हिवाळ्या ऋतूत हृदयाचे आरोग्य सांभाळा - तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2024

हिवाळ्या ऋतूत हृदयाचे आरोग्य सांभाळा - तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ

 हिवाळा ऋतू व हृदयाचे आरोग्य कसे सांभाळावे 

    हिवाळा ऋतू मध्ये हृदयरोग (heart attack) व लकवा (stroke) चे रुग्ण जास्त प्रमाणात सापडतात.

त्याची कारणे व उपाय योजना खालील प्रमाणे

 A) कारणे- 

१) हिवाळ्यामध्ये शरीरातील रक्त वाहून नेणाऱ्या नसा (arteries) या अकुंचित (vasoconstriction) होतात. त्यामुळे रक्तदाब वाढवून रक्त गोठण्याची शक्यता जास्त असते.

२) हिवाळ्यामध्ये शरीराचे तापमान कमी राहते. ते तापमान वाढविण्यासाठी रक्त जादा दाबाने पूर्ण शरीरभर पुरवठा होतो. त्यामुळे हृदयावर जादाचा ताण येतो.

३) हिवाळ्यामध्ये हार्मोनल(hormonal) बदल जादा प्रमाणात होतात. त्यामुळे रक्त गोठण्यासाठी जबाबदार हार्मोन्स (hormones) ची पातळी शरीरामध्ये वाढते, त्यामुळे शरीरात रक्त गुठळी(clot, thrombus) तयार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते.

४) हिवाळ्यात जास्त प्रमाणात भूक लागत असल्याने वारंवार खाणे व थंडीमुळे शारीरिक व्यायाम कमी होतो. या दोन्ही गोष्टीमुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.


 B) जास्त धोका असणाऱ्या व्यक्ती

१) ६० वर्षावरील व्यक्ती

२) अगोदरच हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्ती

३) बैठे काम करणाऱ्या व्यक्ती, सतत ताण तणावात असणारे व्यक्ती

४) रक्तदाब( blood pressure), व मधुमेह( blood sugar) असणाऱ्या व्यक्ती

५) लठ्ठ व जास्त वजन असणाऱ्या व्यक्ती

६) इतर गंभीर आजाराने ग्रस्त असणारे व्यक्ती

 

C) उपाय योजना

१) हिवाळ्यामध्ये पूर्ण शरीर चांगल्या पद्धतीने झाकून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे

२) सकाळी लवकर पहाटे फिरण्यासाठी( morning walk) ला जाण्याऐवजी, थोडे उशिरा सूर्यदर्शन झाल्यानंतर किंवा संध्याकाळी फिरण्यास जाणे अधिक फायदेशीर राहील

३) काही व्यक्ती हिवाळ्यात तहान कमी लागत असल्याने पाण्याचे प्रमाण कमी करतात त्यामुळे blood volume वाढून रक्तदाब वाढतो, म्हणून पाण्याचे प्रमाण कमी न करता भरपूर पाणी पिण्यास हरकत नाही

४) मिठाचा, तळलेले पदार्थ, पॅकेट बंद पदार्थ इत्यादीचा कमीत कमी वापर करावा

५) ताण तणाव कमी करण्याचा प्रयत्न करून योगा प्राणायाम नित्य नियमाने करावेत व व्यसनापासून दूर राहावे

६) रक्तदाब व मधुमेह तसेच हृदयरोग असणाऱ्या व्यक्तीने नियमितपणे त्याची तपासणी करावी व औषधे न चुकता नियमितपणे घ्यावीत

माहितीसाठी जनहितार्थ सादर

डॉ. बी. डी. सोमजाळ

तालुका आरोग्य अधिकारी चंदगड

---------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment