भरमु नांगनूरकर यांची मनसे कुलाबा शाखा २२१ च्या अध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2024

भरमु नांगनूरकर यांची मनसे कुलाबा शाखा २२१ च्या अध्यक्षपदी निवड

  


चंदगड / प्रतिनिधी 

      आमरोळी (ता. चंदगड) येथील रहिवसी व सध्या मुंबई येथे उद्योग धंद्यासाठी स्थाईक असलेले सामाजिक कार्यकर्ते भरमु विठोबा नांगनूरकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुलाबा येथील २२१ शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेल मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याची पोहोच म्हणून त्यांना ही पदोन्नती देण्यात आली आहे. आपल्या संघटन कौशल्याने या भागातील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून द्यावा. यासाठी त्यांना नियुक्तीपत्र व शुभेच्छा देण्यात आल्या.नागरिक, कामगारांचे प्रश्न व अडी अडचणी सोडवण्यासाठी आपण जोमाने कार्य करू व पक्ष वाढीसाठी जोमाने प्रयत्न करू, असे निवडीनंतर नांगनूरकर यांनी सांगितले.

      महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेल मध्ये काम करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुख्य प्रवाहात काम करायची संधी अध्यक्ष राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्या आदेशाने तसेच पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, सरचिटणीस संजय नाईक, महिला सरचिटणीस सुप्रियाताई दळवी, उपाध्यक्ष अरविंद जी गावडे व विभाग अध्यक्ष बबन महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भरमू नांगनूरकर यांची मुंबईतील कुलाबा विधानसभा २२१ शाखाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यापूर्वी पक्ष स्थापनेपासून पक्षातील विविध पदावर प्रामाणिक काम करून कामाला न्याय देण्याचां प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आले आहेत.

      नांगनूरकर यांचे संघटन कौशल्य व सर्व थरातील कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्याचे गुण अचूक ओळखून येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment