आयोध्या राम मंदिर उद्घाटन निमित्त राजगोळी येथे १९ ते २२ रोजी राम जागर व विविध स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2024

आयोध्या राम मंदिर उद्घाटन निमित्त राजगोळी येथे १९ ते २२ रोजी राम जागर व विविध स्पर्धा



कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा 
     आयोध्या नगरीत बांधलेल्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्या निमित्त राजगोळी बुद्रुक, ता. चंदगड येथे दि. १९ ते २२ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन १९ रोजी सकाळी ९ वाजता खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते  माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.  यावेळी आ. विनय कोरे, समरजीतसिंह घाटगे, शिवाजीराव स पाटील, गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी व भगवानगिरी महाराज नूल, शिवलिंगेश्वर महास्वामी निडसोशी, ईश्वर महास्वामी इंचनाळ, संजय पाटील (माजी आमदार बेळगाव), ॲड हेमंत कोलेकर, सतीश घाळी, उदयकुमार देशपांडे, शांताराम पाटील, सचिन बल्लाळ, दीपक पाटील (माजी संचालक गोकुळ), यशवंत सोनार आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. 
     शुक्रवार दिनांक १९ रोजी सकाळी ९ ते १२ उद्घाटन, दुपारी १२ ते ५ भव्य संगीत भजन स्पर्धा, सायंकाळी ६ ते ८ तुळशी रामकथा वाचन (वाचक- मंगेश शिंदे महाराज देवकोहिंडे),  रात्री ८ ते १० कीर्तन (संजय तुकाराम पाटील केंचेवाडी), रात्री ११ नंतर भव्य संगीत भजन स्पर्धा. शनिवार दिनांक २० रोजी सकाळी ९ ते १२ संगीत भजन स्पर्धा, दुपारी १२ ते ५ हरिपाठ स्पर्धा, सायंकाळी ६ ते ८ राम कथा वाचन, रात्री ८ ते १० व रात्री ११ नंतर महिला हरिपाठ स्पर्धा.
      रविवार दिनांक २१ रोजी सकाळी ९ ते १२ साध्वी सोनाली ताई करपे यांचे कीर्तन, दुपारी १२ ते ५ खेळ पैठणीचा, वेशभूषा, मेहंदी रेखाटन, केशभूषा व उखाणे स्पर्धा, सायंकाळी ६ ते ८ राम कथा वाचन पुढील भाग, रात्री ८ ते १० अश्विनीताई म्हात्रे मुंबई यांचे कीर्तन, रात्री ११ नंतर हरी जागर.
     सोमवार दिनांक २२ रोजी सकाळी ९ ते १२ दिंडी सोहळा, दुपारी १२ ते ५ अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळा थेट प्रक्षेपण, सायंकाळी ६ ते ८ राम कथा वाचन अंतिम भाग, रात्री ८ ते १० बक्षीस वितरण सोहळा, दहा नंतर अश्विनीताई म्हात्रे मुंबई यांचे कीर्तन असे नियोजित कार्यक्रम होणार आहेत भजन व हरिपाठ दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना रोख रुपये अनुक्रमे- १५००१, १२५०१, १०००१, ८००१, ६५०१, ५००१, ४००१, ३००१ अशी आठ बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.
     सोहळ्यातील विविध स्पर्धेतील स्पर्धक व येणाऱ्या सर्व भाविकांसाठी रोज दुपारी १२ ते २ व रात्री ८ ते १० या वेळेत महाप्रसाद वाटप होईल. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन निमंत्रक शिवाजीराव स. पाटील (भाजपचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख) यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment