हलकर्णी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ २ फेब्रुवारी रोजी - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2024

हलकर्णी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ २ फेब्रुवारी रोजी

 


चंदगड / प्रतिनिधी

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दिनांक ३१ जानेवारी ते शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 

       दिनांक ३१ जानेवारीला दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होईल. फनी गेम्स याचे उद्घाटन उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते होईल तसेच पाककृती स्पर्धेचे उद्घाटन शितल विशाल पाटील आणि लता संजय पाटील यांचे शुभहस्ते होणार आहे.त्याचबरोबर पारंपारिक वेशभूषेचेही आयोजन ३१ रोजी करण्यात आले आहे. 

        १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी फुडस्टॉल आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन संचालक उत्तम पाटील शिवाजी तुपारे जगन्नाथ इंगवले वसंत निकम बाबुराव शिंदे तुकाराम पाटील यांचे शुभहस्ते. तर रांगोळी प्रदर्शनचे उद्घाटन संचालक अशोक पाटील शिवाजी हसबे मारुती बसर्गेकर पुंडलिक पाटील यांच्या शुभहस्ते होईल. दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न होईल याचे उद्घाटन दौलत विश्वस्त संस्थेचे सचिव विशाल पाटील यांच्या हस्ते ,कार्यकारी संचालक मनोहर होसुरकर यांच्या उपस्थितीत होईल. 

        शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी शेलापागोटे कार्यक्रम होईल याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर यांचे शुभहस्ते होणार आहे..तर सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी विद्यार्थी गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. गोपाळराव पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच कोल्हापूर येथील करियर इन्स्टिट्यूट चे चेअरमन रवींद्र खैरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत. तसेच यावेळी पदाधिकारी संचालक मंडळ विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment