चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील रामपूर येथे सजवलेल्या पालखीत मुख्य कलश ठेवून त्याच्यासमोर डोक्यावर कलश घेतलेल्या भगिनी व वारकरी दिंड्याने, आणि तिथून आणलेल्या अमृतकलशाच्या शोभायात्रेचे सौंदर्य वाढवले. टाळ मृदंगाच्या साथीने श्रीरामाच्या गजरांनी अवघ वातावरण भक्ती झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रामपूर नगरीतील सर्व गल्ल्या फिरवून श्री देव मारुती मंदिरापर्यंत काढलेले मिरवणुकीत आबाला वृद्धांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. स्वागत, सरपंच सौ. सुजाता यादव व उपसरपंच सौ. शालन घोळसे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कलशाचे पूजन धोंडीबा वरपे, एकनाथ गावडे, लक्ष्मण ढेरे, दत्तू घोळसे, गोपाल देवण, अनंत शिवणगेकर, रानबा ढेरे, चंद्रकांत काकडे, मारुती वर्पे दाजीबा वरपे यांच्यासह आदी ग्रामस्थांच्या हस्ते झाल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. यामध्ये गावातील महिला हरिपाठ मंडळ व गावातील वारकरी संप्रदायातील भक्त मंडळी सहभागी झाली होती. टाळ मृदुंगाचा ठेका आणि तालबद्ध भजनाच्या सुरांना समस्त रामभक्ताने स्वरताज चढवला. 86 वर्षाचे राघोबा वरपे हे भगवी पताका घेऊन दिंडीत नाचत असताना सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. गावात हनुमानाचे मंदिर आहे. पूर्वी या गावचे नाव डुक्करवाडी असे होते. परंतु नुकतेच या गावाचे शासकीय दरबारी नामकरण झाले असून ते रामपूर असे झाले आहे. गावात रामभक्त हनुमानाचे मंदिर असल्यामुळे, गावचे नाव रामपूर असे करण्यात आले आहे. आज आयोध्यातून आणलेल्या अमृत कलशाच्या शोभायात्रेसाठी संपूर्ण गाव एक एकत्र आला होता. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून या शोभा यात्रेचे सौंदर्य वाढवले होते. ग्रामपंचायत रामपूरने शोभायात्रेतील सहभागी झालेल्या सर्व भक्तांना नाष्टा आणि चहा पाण्याचे व्यवस्था केली होती.
No comments:
Post a Comment