वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस स्वीकारताना कन्या विद्यामंदिर चंदगडच्या मुली |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड नगरपंचायत वर्धापन दिनानिमित्त नुकत्याच घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांत कन्या शाळा चंदगडच्या विद्यार्थिनींनी कौतुकास्पद यश मिळवले. पथनाट्य स्पर्धेत 'माझी वसुंधरा' या विषयावर शाळेने सादर केलेल्या पथनाट्य सादरीकरणास द्वितीय क्रमांक मिळाला. वक्तृत्व स्पर्धेत शरण्या चेतन शेरेगार व आदिती हळवणकर यांनी यश मिळविले.
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती स्पर्धेत विविध प्रेक्षणीय, अप्रतिम वस्तू तयार करून क्रमांक पटकावत प्रेक्षकांची शाब्बासकी मिळवली. यशस्वी विद्यार्थिनींना वर्गशिक्षिका पूजा बाळकृष्ण तुपारे, मुख्याध्यापक आण्णापा वांद्रे, अध्यापिका निर्मला सावंत, रंजना सुतार, सीमा माने, स्वाती भगत, कांबळे, रमेश बुरुड आदींचे मार्गदर्शन तर शाळा व्यवस्थापन कमिटीचे प्रोत्साहन लाभले.
No comments:
Post a Comment