बुक्कीहाळ बुद्रुक येथे उद्धव ठाकरे शिवसेना शाखेची स्थापना - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2024

बुक्कीहाळ बुद्रुक येथे उद्धव ठाकरे शिवसेना शाखेची स्थापना

 

बुक्कीहाळ येथे शिवसेना शाखा स्थापना प्रसंगी तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर व शिवसैनिक

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची शाखा नुकतीच स्थापन करण्यात आली. तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांच्या पुढाकाराने गावातील तरुणांनी एकत्र येत उद्धव ठाकरे यांचे विचार व त्यांनी मुख्यमंत्री असतानाच्या काळात केलेल्या कामांचे स्वागत करून पक्षात प्रवेश करत शाखेची स्थापना केली. व यापुढे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी निष्ठेने राहणार असल्याचे घोषित केले. लवकरच शाखेचे औपचारिक उद्घाटन होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

       तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर, उपतालुकाप्रमुख विनोद पाटील यांनी  मार्गदर्शन केले. बुक्कीहाळ बुद्रुक नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे शाखाप्रमुख परशराम ढेकोळे, उपशाखाप्रमुख भरमा पाटील, संजय पाटील, परशराम मंडलिक, राजू बचनट्टी, चाळू कोकितकर, सुरेश ढेकाळे, बाळेशी ढबळे, सुरेश होसुरकर, राजू ढबळे, इरेशी ढबळे, नारायण होसुरकर, अर्जुन पाटील आदी शिवसैनिकांची कार्यकारणी निवडण्यात आली. यावेळी विभाग प्रमुख संदीप पाटील, नागरदळे शाखाप्रमुख परशराम मुरकुटे, बुक्कीहाळ बुद्रुक व भागातील शिवसैनिकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment