पत्रकार संघ आयोजित शासकीय, निमशासकीय कर्मचारी 'क्रिकेट स्पर्धेचा थरार' ७ जानेवारीपासून - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2024

पत्रकार संघ आयोजित शासकीय, निमशासकीय कर्मचारी 'क्रिकेट स्पर्धेचा थरार' ७ जानेवारीपासूनचंदगड : सी एल वृत्तसेवा

   मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदा 'पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२४' ही स्पर्धा उद्या रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ पासून इंडॉल क्रीडांगण (बेळगाव वेंगुर्ला हायवे हिंडगाव फाटा नजीक) येथे सकाळी ११ वाजता  सुरू होणार आहे. 

  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शासकीय निमशासकीय व सहकार क्षेत्रातील दिग्गज संघातील थरारक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यंदा या स्पर्धेत गत विजेता महावितरण खेडूत शिक्षण मंडळ स्पोर्ट्स, चंदगड पोलीस, तहसील कार्यालय, पोस्ट, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक, दूध संस्था, चंदगड नगरपंचायत, न्यायालय व वकील बार असोसिएशन, एसटी महामंडळ, कृषी विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग यांच्यासह अनेक दिग्गज संघांचा समावेश आहे.

 स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता इंडाल मैदानावर होणार आहे. यावेळी चंदगडचे दिवानी व फौजदारी न्यायाधीश चारुदत्त शिपकुले, पोलीस निरीक्षक नितीन सावंत, तहसीलदार राजेश चव्हाण, नायब तहसीलदार हेमंत कामत, बांधकाम अभियंता इफ्तेकार मुल्ला, गटविकास अधिकारी संतोष सावंत आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व संघातील खेळाडू, पत्रकार, हितचिंतक व प्रेक्षकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment