'सी एल न्यूज' बातमीचा दणका; नागनवाडी- नेसरी मार्गावर झेब्रा पट्टे मारण्यास सुरुवात, चाळोबा नजीक आज सकाळी अपघातात झाले होते तीन जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2024

'सी एल न्यूज' बातमीचा दणका; नागनवाडी- नेसरी मार्गावर झेब्रा पट्टे मारण्यास सुरुवात, चाळोबा नजीक आज सकाळी अपघातात झाले होते तीन जखमी

सी. एल. न्यूजच्या बातमीमुळे नागणवाडी नेसरी मार्गावरील विविध अपघात प्रवण ठिकाणी झेब्रा पट्टे मारण्यात आले.

अडकूर : सी. एल. वृत्तसेवा
    आज दि ५/१/२०२४ रोजी सकाळी साडेआठ वाजता नागनवाडी ते नेसरी मार्गावरील सावर्डे फाटा, चाळोबा मंदिर नजीक कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन कॉलेज तरुणींसह तिघेजण गंभीर जखमी झाले होते. ही बातमी चंदगड तालुक्याचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या सी. एल. न्यूज हे पोर्टल चैनल वर सकाळी दहा वाजता प्रसिद्ध झाली होते. 
   या बातमीमध्ये मार्गावरील अपघातग्रस्त ठिकाणी स्पीड ब्रेकर तसेच दिशादर्शक व सूचनाफलक लावण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत संबंधित विभागाने त्वरित हालचाली करून दुपार पूर्वीच सावर्डे फाटा अपघात स्थळापासून पासून मार्गावरील विविध गावांचे फाटा रस्ते तसेच अपघात प्रवण ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पांढरे पट्टे मारण्यास सुरुवात केली आहे. याबद्दल प्रवासी, वाहन धारक, ग्रामस्थांतून समाधान व 'सी. एल. न्यूज पोर्टल चॅनेल' चे आभार व्यक्त होताना दिसत होते. 
    सकाळी झालेल्या अपघातात पोवाचीवाडी येथील दुचाकीस्वार दौलत साखर कारखान्याचे कर्मचारी चंद्रकांत गुरव व  माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या विद्यार्थिनी तनुजा विजय मातवंडकर व अंकिता चंद्रकांत गुरव हे तिघे जखमी झाले होते. 


No comments:

Post a Comment