तांबुळवाडी येथे शिक्षण परिषद संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2024

तांबुळवाडी येथे शिक्षण परिषद संपन्न

 


चंदगड / प्रतिनिधी

        तांबुळवाडी (ता. चंदगड) येथे दाटे केंद्रांतर्गत शिक्षण परिषद केंद्रप्रमुख पांडुरंग मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

     प्रारंभी प्रास्ताविक नागोजी भोसले यांनी केले. उपस्थितांचे स्वागत तांबुळवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी केले. यावेळी माझी शाळा, सुंदर शाळा व शालेय पोषण आहार आणि प्रशासकीय सुचना केंद्रप्रमुख मुळीक यांनी दिल्या. शैक्षणिक सहलीवर सखोल मार्गदर्शन दाटे केंद्र शाळेचे पदवीधर अध्यापक प्रकाश पाटील यांनी केले. शालेय नवोपक्रम, विद्यार्थी सहभाग आणि शिक्षक सजगता यांबद्दल सखोल मार्गदर्शन वि. मं. गुडेवाडी शाळेतील अध्यापक अनंत धोत्रे व नागनाथ अडसुळे  यांनी केले. 

      माझी डिजिटल क्यु आर कोड पुस्तिका च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन आणि गणिती क्रिया सुलभ करण्यासाठी उपक्रमाबद्दल वि. मं. वरगांव शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. रंजिता देसूरकर यांच्या उपक्रमाची दखल जिल्हा, राज्य स्तरावर घेणेत आली. याबद्दल त्यांनी शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. विविध विषयावर सांगोपांग चर्चा यावेळी करणेत आली.माझी क्यु आर कोड पुस्तिका उपक्रमाबद्दल सौ.रंजिता देसूरकर व पंचायत स्तर शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड झालेबद्दल प्रकाश पाटील यांचा शाल व गुलाब पुष्प देवून सत्कार करणेत आला. आभार डी. बी. पाटील यांनी केले. शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी दिनकर तावडे, शिवाजी पाटील यांनी कष्ट घेतले. यावेळी केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.



No comments:

Post a Comment