नगरपंचायतीच्या वतीने आयोजित आरोग्य शिबीर व विविध स्पर्धांना नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2024

नगरपंचायतीच्या वतीने आयोजित आरोग्य शिबीर व विविध स्पर्धांना नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड नगरपंचायतच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त व स्वच्छ सर्वेक्षण २०२४, माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत विविध स्पर्धा, उपक्रम, शिबीर यांचे आयोजन करण्यात आले होते. नगरपंचायत चंदगड व संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल, चिंचेवाडी (गडहिंग्लज) यांचे संयुक्त विद्यमाने नागरिकांनसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये पुरुष-स्त्री व जेष्ठ नागरिक यांच्या सर्व तपासण्या करून मोफत औषधे देण्यात आली, या शिबिरामध्ये १०० पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला.

      वक्तृत्व स्पर्धा, टाकावू पासून टिकावू स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धा देव रवळनाथ हॉल चंदगड येथे आयोजन करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाचे  उद्धाटन नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांचे हस्ते व नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायत अधिकारी व संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल, च्या प्रमुख डॉ. प्रियांका देसाई यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. 

     सदर दिवशी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्ध्येचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे प्रथम संगीता देहू यमगर, व्दितीय वेदिका संदीप कोकरेकर, तृतीय आदिती अनिल हळणकर, चतुर्थ शरण्या चेतन शेरेगार, पाचवा प्रांजल अशोक वारंग तर टाकावू पासून टिकावू स्पर्धेत अनुक्रमे प्रथम साईनाथ संतोष ओऊळकर, व्दितीय शर्वरी संदीप चिंचणगी, तृतीय फाल्गुनी भालचंद्र दुधाणी, चतुर्थ निधी दीपक पाटील यांनी प्राविण्य मिळवले.
       या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक (पंच) म्हणून डॉ. संजय नारायण पाटील, प्रा. सुहास व्यंकटेश कुलकर्णी, आर. एम. पाटील लाभले. यावेळी या कार्यक्रमासाठी चंदगड नगरपंचायत चंदगडच्या सन्मानिय नगराध्यक्षा सौ. प्राची दयानंद काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, विरोधी पक्ष नेते  दिलीप चंदगडकर, नगरसेविका सौ. नेत्रदीपा कांबळे, सौ. अनिता परीट, सौ. अनुसया दानी, सौ. माधुरी कुंभार, सौ. संजिवनी चंदगडकर, सौ. संजना कोकरेकर, नगरसेवक अभिजित गुरबे, शिवानंद हुंबरवाडी, नगरपंचायत अधिकारी-कर्मचारी व चंदगड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment