'आर्फा टेलर' कडून वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2024

'आर्फा टेलर' कडून वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        वाढदिवसाला केला जाणारा अनावश्यक खर्च टाळून त्याच पैशातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम कोवाड बाजारपेठेतील 'आर्फा टेलर' फर्मचे संचालक सिकंदर बाबू कांडगावकर यांनी राबवला. आपल्या वाढदिवसानिमित्त मित्र व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील, तालुका सचिव तुकाराम पाटील, व्यापारी शामराव पाटील, काशिनाथ जाधव यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेत कोवाड येथील प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी कांडगावकर यांचे मित्र, शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment