संजय साबळे यांच्या नवोपक्रमाची राज्य स्तरावर निवड - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2024

संजय साबळे यांच्या नवोपक्रमाची राज्य स्तरावर निवड

संजय साबळे

चंदगड :  सी. एल. वृत्तसेवा

        शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्य स्तरीय नाविण्यपूर्ण नवोपक्रमासाठी जिल्हा  शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर (डायट) यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत दि न्यू इंग्लिश स्कूल येथील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी जिल्हयात द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांनी मुलांची अध्ययन क्षमता वाढीसाठी 'खेळ खेळू प्रश्नोत्तराचा, मेळ घालू अभ्यासाचा' हा नाविण्यपूर्ण नवोपक्रम सादर केला. 

    त्याच्या या नवोपक्रमाची राज्य स्तरावर निवड झाली आहे. या नवोपक्रमासाठी त्यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, डायटचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, डॉ. भोई, प्रा. सरीता कुदळे, गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार, प्राचार्य एन. डी. देवळे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment