चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
मूळचे कवी आणि लेखक असलेल्या कळसगादे (ता. चंदगड) येथील अशोक दळवी यांनी चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये एलआयसीचे काम करून सलग ६ वर्ष एलआयसीचा मानाचा एमडीआरटी अमेरिका हा हा किताब पटकावून चंदगडच्या पश्चिम भागामध्ये इतिहास घडवला आहेत. यामुळे त्यांची यावर्षी कॅनडामध्ये होणाऱ्या एमडीआरटी संमेलनासाठी निवड झाली आहे.
एमडीआरटी अमेरिका होण्याचा बहुमान कळसगादे (ता. चंदगड) येथील अशोक दळवी यांनी पटकावल्याबद्दल त्यांचा मूनस्टोन या सामाजिक फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. |
त्यांच्या या कार्याची दखल घेवून मूनस्टोन या सामाजिक फाउंडेशनचे सदस्य विजय मोरे, विवेक पाटील, दीपक माईनकर, श्री. बोरुगले, कृष्णकांत पिलारे, श्री. बोरगुले, रतन वारंग, विजय पाटील आदी व्यक्तींनी अशोक दळवी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
No comments:
Post a Comment