चंदगड / प्रतिनिधी
आजही सर्व विश्वाला प्रेरणा देणारे महान राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जगामध्ये सर्व श्रेष्ठ स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य १७ व्या शतकातील जगातील सर्वश्रेष्ठ महासत्ता होती. स्वराज्याची शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था, समानता व एकता जगाने अनुकरण करावी अशीच आहे. त्यांनी श्रेष्ठतम मूल्यांची जोपासना केलेली होती. छत्रपती देशाचे नव्हेतर जगाचे आदर्श आहेत. आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे आणि जागतिक दर्जाचे योध्दे म्हणून छत्रपतींची ओळख आहे. छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन अनेक देशांनी आपला इतिहास घडविला. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगामध्ये तहहयातच पोहचले होते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया , व्हिएतनाम, वांगलादेश, इंग्लंड, चीन, जपान, इस्त्राईल, स्वित्र्झलंड आदि देशांमध्ये छत्रपतींच्या शौर्याचा सन्मान केला जात आहे असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मधुकर जाधव यांनी केले.
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या हजगोळी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीरात जगाचा आदर्श राजा : छत्रपती शिवाजी राजा या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना समन्वय डॉ. तानाजी चौगुले होते.
डॉ. जाधव पुढे म्हणाले, ``छत्रपतींच्या युध्द शैलीचा अभ्यास आज जगभरातील देश करत आहेत. त्यांचा नौदल, शार्य, बुद्धीमत्ता, युद्धनिती, व्यवस्थापन, मानवताबाद याबाबतचा दृष्टीकोन अदभुत आहे. नुकतेच मॉरिशस येथे छत्रपती शिवाजी महाराजाच्या आश्वरूढ स्मारकाचे लोकार्पण झाले. भारत देशासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. प्रास्ताविक व स्वागत प्रज्वल गुरव यांनी केले. यावेळी तुकाराम पाटील, मारूती नाकाडी, तानाजी नाकाडी, शंकर कनगुटकर, चाळोबा पाटील, विनायक पवार, जोतिबा पवार, तानाजी जाधव, विठ्ठल शिंदे, कार्यक्रम समन्वयक प्रा. यु. एस. पाटील, प्रा. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. ए. एस. बागवान, प्रा. ए. व्ही. नौकुडकर, प्रा. शाहू गावडे, प्रा. वोबाटे, प्रा. काझी, प्रा. मुजावर, भरत गुरव यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शिबीरार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या पाटील यांनी केले. आभार आदित्य सुतार यांनी मानले.
No comments:
Post a Comment