भाजपा ओबीसी जिल्हा सरचिटणीसपदी चेतन बांदिवडेकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2024

भाजपा ओबीसी जिल्हा सरचिटणीसपदी चेतन बांदिवडेकर यांची निवड

चेतन बांदिवडेकर यांना नियुक्तीपत्र देताना बाळासाहेब जाधव, धनंजय महाडिक व मान्यवर

चंदगड /सी. एल. वृत्तसेवा
    भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा कोल्हापूर ग्रामिण पश्चिम जिल्हा सरचिटणीसपदी चेतन बांदिवडेकर यांची नियुक्ती  करण्यात आली आहे.
    यासंदर्भातील नियुक्ती पत्र नुकतेच कोल्हापूर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी चेतन बांदिवडेकर याना दिले. भाजपा ओबीसी समाजाचे संघटन वाढवणे तसेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची जबाबदारी चेतन बांदिवडेकर याना देण्यात आली आहे. या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment