लोकसेवा भावी विचार मंच तडशिनहाळ यांच्यामार्फत विद्यामंदिर तडशिनहाळ शाळेमध्ये मुलांना स्टील पाण्याचे बॉटल वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2024

लोकसेवा भावी विचार मंच तडशिनहाळ यांच्यामार्फत विद्यामंदिर तडशिनहाळ शाळेमध्ये मुलांना स्टील पाण्याचे बॉटल वाटप

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत शाळेमध्ये प्लास्टिक बंदी उपक्रम राबवलेला आहे पर्यावरणास    हानिकारक असलेल्या प्लॅस्टिकचा वापर का करू नये व आपली शाळा प्लास्टिक मुक्त कशी राहील यावर हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड बेळगाव येथील अभियंते सुधीर पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

 सुधीर पाटील यांनी प्लास्टिक कसे तयार केले जाते, त्याचे विघटन कसे होते व त्याचा मानवी शरीरावर व पर्यावरणावर कोणता दुष्परिणाम होतो, प्लास्टिक मुळे मृदा प्रदूषण, जलप्रदूषण व वायु प्रदूषण कसे होते, प्लास्टिक टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत, बायो प्लास्टिकचा वापर कसा करावा यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तेव्हापासून बॉटल प्लास्टिक असल्याने मुलाने शाळेत आणण्यास टाळले हे जाणून घेऊन लोकसेवा भावी विचारमंचने शाळेला स्टील बॉटल देण्याचे ठरवले. स्टील बॉटल देतेवेळी लोकसेवा भावी विचार मंच चे व शाळा व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष रवी कोनेवाडकर उपाध्यक्ष नारायण दळवी सदस्य राजू कदम, रामा दळवी, नामदेव कदम, विक्रम करडे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दत्ता कदम, गुंडू गडकरी सरपंच, पुंडलिक बोलके, महादेव कांबळे, प्रकाश कोणेवाडकर, तसेच विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक गोविंद चांदेकर, डी. जे. पाटील, बाबुराव धामणेकर कीर्ती पाटील विशाल धामणेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment