कोवाड महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्हू - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2024

कोवाड महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्हू

 


कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
     कला, वाणिज्य  विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) येथे कॅम्पस् मुलाखतीचे आयोजन केले आहे.
    महाविद्यालयातील 'करिअर कौन्सेलिंग विभाग आणि ॲक्सिस बँक' यांच्या संयुक्त विद्यमाने २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी बँकेचे प्रतिनिधी मुलाखतीसाठी येणार असून या मुलाखतीत यशस्वी उमेदवाराना ॲक्सिस बँक, गोवा येथे नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर  उमेदवार पात्र आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांसह कोवाड महाविद्यालयात वेळेत उपस्थित रहावे.  अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment