चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच दुबई आणि सत्यशोधक समाज दुबई यांच्या वतीने संयुक्त अरब अमीरात- दुबई येथे ज्ञानवर्धक शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी ग्रँड एक्सेलसीयर हॉटेल बर दुबई येथे हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित राहणार असून जागद्विख्यात व्याख्याते, विचारवंत व प्रबोधनकार गंगाधर बनबरे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत उपस्थित राहून व्याख्यान देणार आहेत. या दिवशी सकाळी १० वाजता नाव नोंदणी, चित्रकला स्पर्धा, जिजाऊ वंदना, शिवगर्जना, सत्यशोधक प्रवास व त्यानंतर तिन्ही मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारनंतर सन्मान चिन्ह प्रदान व स्नेहभोजन असे कार्यक्रमाचे स्वरूप असून या कार्यक्रमास संयुक्त अरब अमीरात व दुबईत राहणारे देशबांधव तसेच शिवप्रेमींनी उपस्थित राहावे. असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचारमंच दुबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment