राजश्री नारायण पाटील |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
मूळचे तेऊरवाडी (ता. चंदगड) व सध्या चंदगड येथील कोर्ट जवळील रहिवासी राजश्री नारायण पाटील (वय 58) यांचे अल्पशा आजाराने चंदगड येथे बुधवारी दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. चंदगड येथील न. भू. पाटील ज्युनिअर कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक, (कोवाड ता. चंदगड) येथील सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक ॲड. एन. एस. पाटील यांच्या त्या पत्नी तर निपाणी येथील ॲड. अनुजा रणजीत माने यांच्या त्या मातोश्री होय.
No comments:
Post a Comment