तेऊरवाडीत भरवला चिमुकल्यांनी बाजार , हजारो रुपयांची उलाढाल - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2024

तेऊरवाडीत भरवला चिमुकल्यांनी बाजार , हजारो रुपयांची उलाढाल

तेऊरवाडी येथे मराठी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी भरलेला बाजार
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
      'भाजी घ्या भाजी , ताजी ताजी भाजी ' या बालकांनी दिलेल्या आरोळ्या तेऊरवाडी ग्रामस्थांच्या सकाळी सकाळी कानावर पडल्या अनं सर्व ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला .
      येथील मराठी विद्या मंदिर तेऊवाडी (ता चंदगड ) च्या इयत्ता १ ली ते ७वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आज गावामध्ये भव्य असा बाजार भरवला . चहा पोहेचा स्टॉल , मेथी, लाल भाजी,  कोथिंबिर , फणस , सोले , घेवडे अशा सर्व प्रकारच्या भाज्या , विविध खाद्य पदार्थ , मोड आलेली धान्ये , चिंचाचे गोळे , विविध प्रकारची मडकी आदि हजारो प्रकार या बाजारात निधार्थ्यानी ठेवले होते . सर्वच विद्यार्थी आपल्या जवळच्या वस्तू व भाजीपाला विकण्यासाठी मोठ मोठ्याने आरोळ्या ठोकत होते .विद्यार्थ्यांनी  विक्रीसाठी ठेवलेल्या या वस्तू व भाजीपाल्याची ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने खरेदी केली . विद्यार्थ्यांना आर्थिक व खरेदी - विक्री व्यवहाराचे ज्ञान मिळावे या उद्देशाने भरवलेल्या या बाजारात हजारो रुपयांची उलाढाल झाली .हा बाजार भरवण्यासाठी मराठी विद्यामंदिर चे मुख्याध्यापक संतान लोबो , अध्यापक संतोष सुर्यवंशी , जयवंत जाधव , विश्वनाथ मनवाडकर , अध्यापिका श्रीमती लता पाटील , सुनिता जाधव यानी विशेष प्रयत्न केले . या बाजाराला सरपंच सौ मनिषा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती माध्यमिक विद्यालयाचा स्टाफ व विद्यार्थी यानी भेट दिली . असाच दर आठवडी बाजार भरवून गावचा भाजीपाला गावातच विकला जावा अशी मागणी काही ग्रामस्थांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment