चंदगड येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2024

चंदगड येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण

  


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       "माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित होऊन विद्यार्थी अष्टपैलू घडतील" असे प्रतिपादन मुख्याध्यापक संघाचे संचालक गुलाब पाटील यांनी व्यक्त केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण व जिल्हा प्रशिक्षण डायट व पंचायत समिती चंदगड शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाटणे फाटा तालुका  चंदगड येथील व्ही. के.चव्हाण पाटील महाविद्यालय येथे आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीकांत पाटील होते. समन्वयक सुनील पाटील यांनी स्वागत केले.प्रास्ताविक एम . एन . शिवणगेकर यांनी केले . यावेळी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष महादेव भोगुलकर , आर . जे . पाटील , एन. डी. देवळे , आर . के कदम , एम .बी पाटील ' पी . टी वडर , एम . एम गावडे , यु .एल पवार,  उपस्थित होते .

        ई .एल. पाटील , के . ए .पाटील , एल . पी . पाटील , एम बी पाटील , एस एम कांबळे , ए .व्ही नौकुडकर ,एस जे . बोकडे , डी .डी बेळगावकर , जे . एल तोराळकर ,व्ही .एल सुतार यांनी .सुलभक म्हणून काम पाहिले . उपस्थित होते. प्रशिक्षणात एकूण 320 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते . कार्यक्रमांचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार पाटील यांनी मांडले .

No comments:

Post a Comment