माणगाव / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील बागिलगे डुक्करवाडी विद्यालय व जुनि. कॉलेज येथे 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला. सुरुवातीला प्रास्ताविक आर जी शिवणगेकर यांनी केल्यानंतर थोर शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. के आर गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना विज्ञान शिक्षक ए बी नाईकवाडी म्हणाले रमण इफेक्ट या थोर कार्याचा गौरव म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1987 ला पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. शास्त्रज्ञ सी.व्ही रमण यांनी भौतिकशास्त्रात विविध शोध लावले आहेत. त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा नावलौकिक केला .त्यानी केलेल्या महान संशोधनाच्या कार्यामुळे त्यांना 1930 सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पी एस मगदूम यांनीही त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी विज्ञान शिक्षक ए बी नाईकवाडी , व्ही. एन मुंगारे, जे एम मजुकर या विज्ञान शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे अवचित साधून आर जी शिवणगेकर यांनी जादूचे प्रयोग अंतर्गत विज्ञानातले चमत्कार यावेळी विद्यार्थ्यांना करून दाखवले.
यावे ए डी सांबरेकर, एस जी पाटील, पी जी कांबळे, श्रावण बेनके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी व्ही पाटील यांनी केले तर आभार के टी चिंचणगी यांनी मानले.
No comments:
Post a Comment