प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक संघाचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2024

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक संघाचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देताना शिक्षक संघ पदाधिकारी 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज चंदगड येथे उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांना शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. अशी माहिती संघटनेचे चंदगड तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिली.

         निवेदनात विषय शिक्षक रिव्हर्सन तात्काळ अंमलबजावणी व्हावी. शिक्षक भरतीपूर्वी जिल्हाअंतर्गत बदल्यांची संधी शिक्षकांना मिळावी. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करून त्यांना स्व तालुक्यात पदस्थापना द्यावी. सेवा जेष्ठतेनुसार केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया तात्काळ अंमलबजावणी करावी. नवभारत साक्षरता अभियान या अशैक्षणिक कामकाजातून प्राथमिक शिक्षकांना कायमस्वरूपी वगळण्यात यावे. आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. मंत्री ना. धनंजय मुंडे, चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील, सल्लागार रमेश हुद्दार, कोषाध्यक्ष रमेश नाईक, जिल्हा उपाध्यक्ष दस्तगीर ऊस्ताद, प्रवक्ते संजय गावडे, कार्याध्यक्ष विनोद कोरवी, संजय पाटील, सुरेश बाबुराव पाटील, सोमनाथ चाटे आदी पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.



No comments:

Post a Comment