कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
नियमित कर्ज भरण्याऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये अनुदान देण्याबाबत आचारसंहितेपुर्वी निर्णय घेण्यात येणार आहे. सौर कुंपण योजना राबविण्यासाठी निधी देण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. सौर पंपासाठीही अनुदान देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल चंदगडच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे ८५० कोटींचा निधी दिला आहे. आता यापुढेही विकासाठी निधी देऊन चंदगडचा सर्वांगीण विकास करू. चंदगड नगरपालिकेच्या उभारणीसाठी ५ कोटीचा निधी दिला असून इमारतीच्या फर्निचर व वॉल कंपाउंडसाठी व चंदगडमधील रस्ते सुधारण्यासाठी प्रत्येकी ५-५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. चंदगड हा डोंगराळ व दुर्गम भाग असून त्याच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंदगड येथे आश्वासन दिले.नगरपंचायतीच्या कै. नरसिंगराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी इमारत व प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला अनावरण तसेच चंदगड नगरपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार समारंभावेळी बोलत होते.अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील होते.
प्रारंभी नगराध्यक्षा सौ.प्राची काणेकर यांनी प्रास्ताविक करून चंदगडचे रवळनाथ मंदिराचा "ब"वर्गात समावेश करावा व चंदगड शहरासह उपनगरातील नागरिकांसाठी नवीन शुध्द नळपाणी योजना मंजूर करावी अशी मागणी केली. या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ``चंदगड, गडहिंग्लज, आजरा या परिसरात काजू पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काजू पीकाच्या विकासासाठी राज्य शासनाने १ हजार ३२५ कोटीची तरतूद केली आहे. या निधीमधून काजू पीकाच्या विविध प्रक्रियेचा विकास होण्यास मदत होणार आहे. काजू पीकापासून वाईन बनविणे तसेच काजू बी परतावा याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल. चंदगड मतदार संघातील जांभरे, तळकट, गोवा रस्त्याचे काम मार्गी करण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल. असे सांगून श्री. पवार म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी देण्यात येत असून वैद्यकीय सुविधांसाठी १ हजार कोटी निधीचा प्रस्तावित करण्यात आला आहे. आरोग्य, शिक्षण याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनालाही चालना देण्यात येणार आहे.भारत देश हा जगाच्या पहिल्या ५ अर्थव्यवस्थेमध्ये पोहचला असून यामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्राचीही अर्थव्यवस्था मजबूत करण्यात येत असून १ ट्रीलीयनवर नेण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे, यावेळी श्री.पवार यानी चंदगडी बोली भाषेचा बोलबाला सातासमुद्रापार गेल्याचेही सांगितले.``
पालकमंत्री हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले, ``चंदगड मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वच योजनांच्या माध्यमातून निधी देण्यात येत आहे.किटवडे येथे धरण बांधणे, प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याबाबतची कार्यवाही करू असे सांगून, चंदगड भागात पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची कमतरता पडू नये, यासाठी आवश्यक ते सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.आमदार राजेश पाटील यांनी चंदगड मतदार संघात आतापर्यंत ८५० कोटींची कामे करण्यात आली असून पुढील काळातही विकास कामासाठी निधी मागविण्यात आला आहे. असे सांगून चंदगड येथे ट्रामा केअर युनीट व उपजिल्हा रूग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगुन विविध पिके घेणाऱ्यां चंदगड तालुक्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची गरज असल्याचे सांगितले.``कृषीमंत्री धनजंय मुंडे यांनी चंदगड तालुक्यात आल्यानंतर गोव्यात आल्याचा भास होतोय असा इथला निसर्ग असल्याचे सांगितले. यावेळी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, चंदगड अर्बन चेअरमन दयानंद काणेकर, भिकु गावडे, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, अभिजित गुरबे, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार राजेश चव्हाण यासह सर्व नगरसेवक, नागरिक यावेळी उपस्थित होते. आभार नगरसेवक शिवानंद हुंबरवाडी यांनी मानले.
No comments:
Post a Comment