वृद्ध स्वातंत्र्यसैनिक सखारामबापू फदाट यांचा मानपत्र देऊन सन्मान करताना शासकीय अधिकारी |
जालना : सी. एल. वृत्तसेवा
मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या कुरघोड्या रोखण्यासाठी अनेक क्रांतिकारक पुढे आले. जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक सखारामजी बापू फदाट हे या चळवळीत नेतृत्व करत होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याला १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र मिळाले आणि मराठवाडा भूमी परकीय राजवटीच्या वरवंट्या खालून मुक्त झाली. या मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या बोरगाव बुद्रुक, ता. जाफराबाद, जि. जालना येथील ९६ वर्षीय जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक सखाराम बापू पदाट- पाटील यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनी जालना येथे सन्मान स्वीकारण्यासाठी वृद्धत्वामुळे जाऊ न शकलेल्या या स्वातंत्र्यसैनिकाचा शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला. शासनाच्या वतीने ना. अतुल सावे (मंत्री गृहनिर्माण इतर मागास व बहुजन कल्याण तथा पालकमंत्री जालना) व डॉ श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी जालना यांच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ प्रदान करण्यात आले. यावेळी तलाठी अमोल जाधव, माजी सैनिक तुकाराम फदाट, कृष्णा वाहुळे, ज्ञानेश्वर पंडित, राहुल फदाट, सामाजिक कार्यकर्ते हर्षल पाटील फदाट उपस्थित होते.
No comments:
Post a Comment